
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी येथे 17 डिसेंबर रोजी Wabco/Zf ब्रेक सिस्टीम तर्फे अवजड वाहने ब्रेक संदर्भात प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चालक, वाहक, वाहनधारक, मेकॅनिक, स्कुल बस चालक यांना प्रणाली ABS, EBS याबद्दल चित्रफिती, प्रत्यक्ष वाहनांवर प्रणाली कशी काम करते, डुज आणि डोन्ट, प्रिव्हेंटिव्ह देखभाल इत्यादीवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपघात तपासणीच्या दृष्टीने मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी वाहन चालकांचे आरोग्य तपासणी व डोळे तपासणी मोफत करण्यात आली.
शिबीरास सर्व प्रमुख वाहतुक संघटना प्रतिनिधी, संजय घोडावत इंस्टिट्युट, डीकेटीई, राज्य परिवहन महामंडळमधील मॅकेनिक व वाहन चालक यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षणासाठी लकी अॅटोव्हील, कोल्हापूर यांनी एक अवजड वाहन उपलब्ध करुन दिले. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले इचलकरंजी व कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाहतुक संघटनेचे अशोक शिंदे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

