
SP-9:- पब्लिक रिलेशन ऑफिसर आकिब जहांगीर
श्रीवर्धन (ता. रायगड) येथे आज सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला असून पुण्याहून आलेल्या टुरिस्ट चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार परवेज हमदुके हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीवर्धन परिसरात भरधाव वेगात आलेल्या टुरिस्ट वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की परवेज हमदुके हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. परवेज हमदुके यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून टुरिस्ट वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी भरधाव वाहनचालना व निष्काळजीपणामुळे असे अपघात वाढत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकरणाबाबत फैसल हुरझुक यांनीही माहिती दिली असून जखमी परवेज हमदुके यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सर्व स्तरांतून प्रार्थना केली जात आहे.


