
पन्हाळा प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे
सुतार–लोहार उन्नती संस्थेच्या पन्हाळा तालुका अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्या यांनी सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल सर्व स्तरांतून घेतली जात आहे. समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने राबविलेले उपक्रम, संघटन बळकटीकरण आणि जनतेशी थेट संवाद साधत केलेले कार्य प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील समाजबांधवांना एकत्र आणून विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात येत असून ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे महिलांना नेतृत्वाची नवी दिशा मिळत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे.

