
कोतोली प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे
सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागीय ज्युदो स्पर्धेत कोतोलीचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. माळवाडी-कोतोली येथील माध्यमिक विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. देवयानी शहाजी बाऊचकर हिने 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देवयानीच्या या पराक्रमामुळे तिची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी पुणे येथे निवड झाली असून, गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, संस्था सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. संग्रामसिंह मोरे, मुख्याध्यापिका तेजस्विनी पाटील यांच्यासह सीमा पाटील, मानसिंग पाटील, संदीप वंजीरे, राजू गावीत, शिवाजी खापणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पालक शहाजी बाऊचकर यांचा प्रोत्साहनपर सहभागही उल्लेखनीय ठरला आहे.
देवयानीच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल विद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजीराव पाटील व तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते देवयानीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बंडा लाड, संदीप वंजीरे, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सीमा पाटील, शहाजी बाऊचकर, शिवाजी खापणे, मानसिंग पाटील, राजू गावीत, प्रा. एम. वाय. पोवार उपस्थित होते.
देवयानीच्या या यशाबद्दल तिचे विद्यालय, कुटुंब व कोतोली परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

