
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
शेतकऱ्यांच्या प्रगतीस नवा ऊर्जामार्ग!— नविद मुश्रीफकोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ आणि एन.डी.डी.बी. मृदा तसेच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून राबविण्यात येणाऱ्या ‘गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, सन २०२५-२६ साठी ५ हजार नवीन बायोगॅस युनिट्स मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.गेल्या दोन टप्प्यांमध्ये ७,२०० दूध उत्पादक कुटुंबांना बायोगॅसचा लाभ मिळाला असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला उत्पादकांना २४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. परिणामी महिलांना स्वयंपाकासाठी स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध झाले असून, घरगुती खर्चात लक्षणीय बचत होत आहे.💡 आधुनिक बायोगॅसचे नवे रूपनव्या टप्प्यातील बायोगॅस युनिटमध्येचार्जिंग लाइटर,मिक्सिंग टूल,अतिरिक्त सेफ्टी व्हॉल्व,आणि पुनर्वापर करता येणारा फिल्टर अशा आधुनिक सुविधा जोडण्यात आल्या आहेत.वस्तू व सेवाकरात (GST) कपात झाल्याने युनिटची किंमत कमी झाली असून, २ घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस युनिटची एकूण किंमत ₹४१,२६० आहे. अनुदानानंतर उत्पादकास केवळ ₹९,३६६ भरावे लागतात. गॅस अंतर १५० फुटांपेक्षा जास्त असल्यास बुस्टर पंपासाठी ₹१,५०० अतिरिक्त लागतील.🌱 बचत, खत आणि पर्यावरणपूरक शेतीचा संगमया योजनेमुळेगॅस सिलेंडरवरील वार्षिक ₹१५,००० ते ₹१८,००० बचत,तर बायोस्लरीमुळे खतांच्या खर्चात ३०–५०% बचत होते.यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळाली असून, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ शेती प्रणालीचा प्रसार होत आहे.🐄 शेतकऱ्यांच्या ऊर्जास्वावलंबनाची दिशागोकुळने या योजनेसंदर्भात परिपत्रक जारी केले असून, कोल्हापूर जिल्हा व सीमाभागातील गोकुळशी संलग्न सर्व दूध उत्पादकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.> “गोबरसे समृद्धी ही केवळ ऊर्जा निर्मिती नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि पर्यावरणीय प्रगतीची नवी दिशा आहे. प्रत्येक दूध उत्पादकाने या योजनेचा लाभ घ्यावा,”— नविद मुश्रीफ, चेअरमन, गोकुळ दूध संघ

