पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘दालन २०२६’ प्रदर्शन होणार भव्यदिव्य!

0
197

कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे


क्रिडाई कोल्हापूरतर्फे वास्तू व बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाचा संगम – ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान महासैनिक दरबार हॉल मैदानावर उत्सवाचे स्वरूप पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूर तर्फे वास्तू व बांधकाम विषयक भव्य प्रदर्शन ‘दालन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महासैनिक दरबार हॉल मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे.

संघटनेचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी सांगितले की, “दालन” या उपक्रमाची सुरुवात सन १९९२ मध्ये झाली असून, प्रत्येक वेळी या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यंदाचे हे १३ वे दालन अधिक आकर्षक आणि माहितीपूर्ण स्वरूपात ग्राहकांसमोर येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक इमारत साहित्य, गृहप्रकल्प आणि गुंतवणुकीच्या संधी — या सर्वांचा संगम एकाच छताखाली अनुभवता येणार आहे.

दालन २०२६ ची प्रमुख समिती खालीलप्रमाणे :
चेअरमन – महेश यादव
व्हा. चेअरमन – आदित्य बेडेकर
कन्व्हेनर – निखिल शहा
सचिव – संग्राम दळवी
खजानिस – अमोल देशपांडे
सहसचिव – उदय निश्चीते, शौर्य मगदूम
सहखजानिस – लव पटेल

तसेच विविध कार्यकारी समित्यांची निवड करण्यात आली असून, त्यात –
बिझनेस प्रमोशन व मार्केट कमिटी : गौतम परमार,
ग्राउंड कमिटी : श्रीकांत पाटील,
पब्लिक रिलेशन कमिटी : प्रतिक होसमणी,
प्रिंटींग कमिटी : विजय माणगांवकर,
हॉस्पिटॅलिटी कमिटी : केतन शहा,
इनोग्रेशन व फेलिसिटेशन कमिटी : बलराज पाटील,
सोविनिअर कमिटी : संदीप बोरचाटे,
रजिस्ट्रेशन कमिटी : योगेश आठले अशा जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

चेअरमन महेश यादव यांनी सांगितले की, “या प्रदर्शनात आतापर्यंत ६० पेक्षा अधिक बिल्डर्सनी सहभाग नोंदवला असून, तब्बल १२५ प्रोजेक्ट्स सादर होणार आहेत. त्यात रेसिडेन्शियल, कमर्शियल व प्लॉट प्रोजेक्ट्स समाविष्ट आहेत. सध्या ७० टक्के स्टॉलचे बुकिंग पूर्ण झाले आहे.

या दालनमध्ये १६३ स्टॉल्स असतील —
प्लॅटिनम स्पॉन्सर १, डायमंड २, गोल्ड ५, सिल्वर ८, सेमी स्पॉन्सर १२, कॉर्नर स्टॉल २४ व रेग्युलर स्टॉल १०३.
आता मटेरियल सप्लायर्स व बँकांसाठी स्टॉल्स खुले करण्यात येणार आहेत.”

दालनचे उद्घाटन शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी करण्यात येणार असून, ग्राहकांसाठी हे प्रदर्शन सलग चार दिवस खुले राहणार आहे.

या बैठकीस क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, दालन समितीचे सर्व पदाधिकारी आणि क्रिडाईचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी आभार प्रदर्शन सचिव गणेश सावंत यांनी केले.

— क्रिडाई कोल्हापूर : बांधकाम, नवकल्पना आणि विकासाचा विश्वासार्ह संगम! 🏗️✨

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here