जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक : अशोक पोतनीस

0
7

कोल्हापूर : जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असते असे उद्गगार अशोक पोतनीस यांनी आज काढले. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि मँगो एफ. एम. 90.4 यांच्या सहयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प आमचे ज्येष्ठ नागरिक, आमचा अभिमान या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि मँगो एफ. एम. 90.4 यांच्या सहयोगाने आज महावीर गार्डन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भारताच्या संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानाने दिलेल्या विविध अधिकारांमुळेच ज्येष्ठ नागरिकही रोजच्या येणाऱ्या समस्यांना धैर्याने सामोरे जात असल्याचे अशोक पोतनीस यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी शासनाचा नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन असतो असे त्यांनी स्पष्ट केले. आज या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या १४५६७ या टोल फ्री हेल्पलाईनची माहिती समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूरच्या प्रतिनिधी सौ. आशा रावण यांनी उपस्थितांना दिली. या हेल्पलाईनचा निश्चितच सर्वांना चांगला उपयोग होऊन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येबाबत शासनाचाही दृष्टीकोन अधिक सकारात्मक होईल असा विश्वास उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शासनाच्या विविध योजना नेहमीच जनतेपर्यंत पोहचविण्याचा मँगो एफएमचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असलेचे नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला गजानन घाग, विजय पोतदार, अनिल शिंद, मिलिंद डिगे, बंडोपंत लोखंडे, सुरेश कुमठेकर, अल्लाबक्ष तांबोळी, सत्येंद्र हरिदास, बाबासाहेब वडगावंकर, सतिश वडणगेकर, बाळासाहेब कोळेकर, राजेंद्र मकोटे, प्रमोद व्हणगुत्ते यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here