विकेंद्रित ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्रिप्टोग्राफी भविष्यात सर्वव्यापीडॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेतील सूर

0
157

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे:

डिजिटल विश्वातील पारदर्शकता आणि सुरक्षितता याबाबतच्या संकल्पना ब्लॉकचेन आणि क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे बदलत असून हे तंत्रज्ञान भविष्यात सर्वव्यापी ठरणार आहे. ‘डिजिटल ट्रस्ट’ आणि ‘इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट’ यांचा पाया या नवतंत्रज्ञानामुळे अधिक भक्कम होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन, डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपाच्या चर्चासत्रात हा सूर उमटला. परिषद आयईईई (पुणे व मुंबई सेक्शन) आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने झाली.

‘सेक्युरिंग हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘लँड रेकॉर्ड मॅनेजमेंट’ आणि ‘फायनान्स ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी’ या विषयांवर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या प्रभावावर सखोल चर्चा झाली. या चर्चेत डॉ. राजेश इंगळे (चेअरमन, आयईईई कॉम्प्युटर सोसायटी पुणे चॅप्टर), डॉ. विद्यासागर पोतदार (कर्टीन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया), डॉ. गिरीश खिलारी (सीटीओ, इलिऑट सिस्टिम्स प्रा. लि.) आणि डॉ. सुहास सपाटे (प्राचार्य, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट) यांनी सहभाग घेतला. त्यांनी ब्लॉकचेनचे मूलभूत ज्ञान, उपयोग आणि दैनंदिन जीवनातील अनुप्रयोग यावर प्रकाश टाकला. श्रोत्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन करण्यात आले. चारुदत्त जोशी यांनी कुशल सहसंवादक व निवेदक म्हणून भूमिका पार पाडली.

रुग्णांच्या सुरक्षित वैद्यकीय नोंदी, जमीन व्यवहारातील पारदर्शकता आणि जलद, कमी खर्चातील सीमापार पेमेंट्स यांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

परिषदेत देश-विदेशातील संशोधकांना महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमात पोवाडा, कोळी नृत्य, शेतकरी नृत्य आणि शिवराज्याभिषेक सोहळा यांचे प्रभावी सादरीकरण झाले.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, गौरव गावडे, तसेच व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि संस्थेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी उपस्थित मान्यवर, माध्यम प्रतिनिधी व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here