
प्रतिनिधी : रोहित डवरी
कोल्हापूर प्रतिनिधी:*शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांची नुकतीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये (L.C.B.) बदली करण्यात आली आहे. गेल्या एक ते सव्वा वर्षांच्या काळात त्यांनी शिरोली एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवून पोलिस दलाची प्रतिमा अधिक उज्ज्वल केली. त्यांच्या बदलीची बातमी समजताच नागरिकांमधून *“योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली”* अशा भावना व्यक्त होत आहेत.चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनतेशी आत्मीयता या तिन्ही गुणांचा उत्कृष्ट संगम साधला. ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असल्याने त्यांना सामान्य माणसाच्या भावना आणि अडचणींची जाणीव होती. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाकडे ते वैयक्तिक लक्ष देऊन, समस्यांचे त्वरित आणि न्याय्य निराकरण करण्याचा प्रयत्न करत असत.

दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ठाण्यात हजर राहून त्यांनी प्रत्येक कामाचा निपटारा त्या त्या दिवशी करण्याची सवय लावली होती. नागरिकांना “आपलेसे” वाटणारे, लोकांशी थेट संवाद साधणारे आणि प्रामाणिक कामगिरी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.शिरोली एमआयडीसी परिसरातील विविध गुन्हे उघडकीस आणण्यात, स्थानिक गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यात त्यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळेच त्यांच्या बदलीची बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसाठी “बळकटीचा टप्पा” मानली जात आहे.स्थानिक नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या नव्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा देताना आशा व्यक्त केली की —*“प्रमोद चव्हाण हे अधिकारी ज्या पद्धतीने शिरोली एमआयडीसीमध्ये काम करून एक विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली, त्याच तळमळीने ते L.C.B. मध्येही उल्लेखनीय कामगिरी करतील.”*निश्चितच, त्यांच्या मेहनतीला, जनसंपर्क कौशल्याला आणि गुन्हेगारीविरुद्धच्या ठाम भूमिकेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यात नवे बळ मिळेल, यात शंका नाही.


