गांधीनगर बाजारपेठेतील चोरी उघड — रेहान शेख अटकेत..

0
26

पांडुरंग फिरंगे ,प्रतिनिधी

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांधीनगर बाजारपेठेतील आयुष मेन्सवेअरसह आठ दुकानांचे शटर उचकटून चोरी करणारा रेहान रईस शेख (१९, टिटवाळा, जि. ठाणे) या चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून ₹१६,१०० किंमतीचा मुद्देमाल (रोख रक्कम व मोबाईल हँडसेट) जप्त करण्यात आला आहे.ही चोरी २३ ते २४ ऑक्टोबरदरम्यान घडली होती. अज्ञात चोरट्याने ₹१.७० लाख रोख रक्कम चोरून इतर सात दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७२/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्ह्याच्या तपासासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथक तयार केले.पथकातील पो.उ.नि. जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर (ठाणे) येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली.सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजु कोरे, अमित मर्दाने, सचिन जाधव, अमित सर्जे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, संजय हुंबे, संतोष बरगे, हंबीरराव अतिग्रे, सतिश सुर्यवंशी व शिवानंद मठपती यांनी केली.✍️ पांडुरंग फिरींगे, कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here