
प्रतिनिधी :जानवी घोगळे
ज्ञानज्योती स्पर्धा केंद्रात मार्गदर्शन कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
: “स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास आणि शिस्त या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक मा. राजेंद्र सानप साहेब यांनी केले.
ज्ञानज्योती स्पर्धा केंद्राच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दत्तात्रय सूर्यवंशी , डॉ. संजय पाटील, योगेश्वर पाटील (हेड कॉन्स्टेबल), कृष्णा पाटील, सुधीर पाटील, सचिन पाटील, सोनदेव बेलेकर, विकास वाळवेकर, प्रकाश पोवार, सर्जेराव पोवार, बाजीराव पाटील, मयूर पाटील, सचिन सुतार, अनिल साळवी, शलेश मस्कर, नयन पोवार, सौरभ मस्कर, शुभम भोसले आणि सिद्धार्थ पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यासातील नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, तसेच शासकीय सेवेसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ज्ञानज्योती स्पर्धा केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नियमित मार्गदर्शन, परिक्षा सराव व प्रेरणादायी सत्रे आयोजित करून त्यांचे सर्वांगीण हित जपले जाते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्ग यांनी परिश्रम घेतले.

