डेंटो डेंटल : आपल्या दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी एक विश्वासू पर्याय

0
43

कोल्हापूर, प्रतिनिधी : जानवी घोगळे

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच सुंदर आणि निरोगी दात असणे ही आजच्या काळाची अनिवार्य गरज बनली आहे. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन व योग्य सल्लागार असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर–गगनबावडा रोडवरील फुलेवाडी येथे डॉ. संध्या मक्तेदार (गुरव) यांच्या “डेंटो डेंटल” या दंतचिकित्सा क्लिनिकचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

डॉ. संध्या मक्तेदार (गुरव) यांनी भारताबरोबरच परदेशातदेखील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. दंतचिकित्सेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य यामुळे रुग्णांना आधुनिक व विश्वासार्ह उपचार मिळणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.

“डेंटो डेंटलमध्ये रुग्णांना उत्तम, अत्याधुनिक आणि संवेदनशील सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे डॉ. संध्या मक्तेदार (गुरव) यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here