
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कसबा बावडा येथील जगद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदाय, कसबा बावडा व भोसलेवाडी सेवाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री काशिलिंग मंगेश्वर हॉल, कसबा बावडा येथे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात एकूण १०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला.
या शिबिरातील रक्तसंकलन श्री महालक्ष्मी रक्तकेंद्र यांच्या वतीने करण्यात आले. रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या “जीवनदान महाकुंभ २०२६” या उपक्रमांतर्गत हे शिबिर घेण्यात आले होते.
यावेळी जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी, तालुका संजीवनी प्रमुख प्रदीप आळवेकर, प्रवीण आळवेकर, सदाशिव पोवार, कौस्तुभ सावंत, सुभाष सावंत, विजय पाटील, श्यामराव चिकोडे, उत्तम तेजम, उत्तम माळी तसेच दोन्ही सेवाकेंद्रांतील स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

