
वाठार (प्रकाश कांबळे)
वाठार ता हातकणंगले येथे श्री महादेव मंदिर समोर शरण्या फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा प्रवीण भोसले यांच्या दारात आज पहाटे 3:15 च्या सुमारास भानामतीचा प्रकार घडला आहे
गेल्या महिन्या भरात 3 जानेवारी पासून आज पर्यंत त्यांच्या तेली मळा नावाच्या शेतात, महादेव मंदिर पाठीमागील शेतात आणि आज पहाटे राहत्या घराजवळ भानाम्याचा प्रकार घडला आहे या उतारा प्रज्ञा भोसले यांच्या फोटो असलेल्या तीन बाहुली वरती दोरा गुंडाळून व फोटोमध्ये मोळा मारून एक नारळ त्याला दोरा गुंडाळला आहे व अकरा लिंबू, गुलाल, काळे उडीद, हळदी कुंकू असे सर्व साहित्य लाल कापडात गुंडाळून त्यावरती हिरवा ब्लाउज पीस बांधून पहाटे 3 15च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तीने येऊन ठेवल्याचे त्यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे कोणाच्या लक्षात आले नाही सकाळी उठून पहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून
या बाबत प्रज्ञा भोसले म्हणाल्या कि गेल्या महिन्याभरात आमच्या शेतामध्ये दोन ठिकाणी व आज पहाटे आमच्या दारात हा भानामतीचा अघोरी प्रकार घडला असून असल्या वाईट प्रकाराचा मी निषेध व्यक्त करते.



