
शहीद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कौलव येथे संपन्न
तिटवे: प्रतिनिधी : प्रमोद पाटील
येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) हिवाळी शिबीर दि. 11जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान राधानगरी तालुक्यातील कौलव येथे या कॅम्पचे आयोजन करण्यात होते. या कॅम्पमध्ये शंभर विद्यार्थीनीं सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होत ‘शहीद’ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जोपासत उल्लेखनीय कार्य केले. एनएसएस शिबिराच्या माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांसाठी स्वच्छता मोहीम, आरोग्य जनजागृती, सेंद्रिय शेतीविषयक उपक्रम आणि साक्षरता अभियान राबवले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामस्थांनी सकारात्मक बदल अनुभवला असून, या विद्यार्थिनींच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘नॉट मी बट यू’ असे बीद्रवाक्य असलेल्या ‘एनएसएस’च्या माध्यमातून चिरस्थायी ग्रामीण विकास, ही या शिबिराची संकल्पना आहे. या शिबिरातह महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी कौलव
ता. राधानगरी येथे विविध प्रकारचे उपक्रम राबवले. कॅम्प समन्वयन प्रा. अविनाश पालकर, प्रा. सुप्रिया पाटील ,निकिता पाटील आदींनी केले.
राशिवडे बुद्रुक गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य आदीनी परिश्रम घेतले.
पहिल्या दिवशी एन एस एस कॅम्प चे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सोशल मीडिया वापर व त्याचा परिणाम याविषयी सर्वेक्षण घेण्यात आले. जलसंधारण पर्यावरण संवर्धन व संरक्षण काळाची गरज यांवर राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांचे व्याख्यान झाले. मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक शेती काळाची गरज यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांचे व्याख्यान झाले. महिलांसाठी हळदीकुंकू, फनी गेम्स ,पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच पाणी आहे तर उद्या आहे उद्या आहे तर जीवन आहे यावर राज्य व राष्ट्रीय तज्ञ व्याख्याते संदीप पवार यांचे व्याख्यान झाले. श्री साई ब्लड बँक गारगोटी यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. तसेच जलसंधारण जल व्यवस्थापन जनजागृती यावर व्याख्याते स्वप्निल पवार यांची व्याख्यान झाले.या शिबिरास कौलव आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. वृक्षारोपण व हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाल्या. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ही संपन्न झाला. या सर्वच कार्यक्रमांसाठी कौलव येथील महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
हे हिवाळी शिबीर यशस्वी होण्यासाठी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, कौलव गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य ,ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सर्व सेवा संस्था,दूध संस्था सदस्य सभासद व कर्मचारी, तरुण मंडळे, आजी-माजी सैनिक संघटना, वाचनालय, महिला बचत गट, माजी सदस्य व पदाधिकारी, तलाठी, पो. पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, आरोग्य सेवक आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, केंद्र शाळा कौलव, गावातील सर्व भजनी मंडळे व ग्रामस्थ,यांचे सहकार्य लाभले.

