
प्रतिनिधी मेघा पाटील
Zकोल्हापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे व पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी( मुंबई )यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तांत्रिक सहकार्याने घेण्यात आलेल्या राज्य शालेय रोलर हॉकी स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या संघाने १९ वर्षातील शालेय राज्य रोलर हॉकी स्पर्धेत कास्यपदक मिळवले.स्पर्धेमध्ये आठ विभागाचे संघ सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे आणि सी.ई.ओ.श्री कौस्तुभ गावडे संस्थेच्या सचिवा,प्राचार्या .सौ. शुभांगी मुरलीधर गावडे.यांनी अभिनंदन केले. विजयी संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे :- ओम अंगज. मयूर कुराडे. साकेत आपके.हर्षद जगताप. केविन गोजालर्विस. नीलवर्धन शिंदे. निहाल कोतवाल.अश्वजीत पाटील. आयुष सावंत. श्लोक पटेल. वरील सर्वांना कॉलेजचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका गुरुदेव वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुपरवायझर प्रा.असिफ कोतवाल. विज्ञान विभाग प्रमुख.प्रा.अनिल जाधव. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सागर पाटील.यांचे मार्गदर्शन तर जिमखाना विभाग प्रमुख डॉ. महेश अभिमन्यू कदम. यांचे प्रशिक्षण लाभले. माननीय, संपादक सो, वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून आम्हास सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपले. डॉ. महेश अभिमन्यू कदम. जिमखाना विभाग प्रमुख न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर.