
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा अखेर ठरला आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्र राज्य महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.