
प्रतिनिधी रोहित डवरी
मुंबई प्रतिनिधी: आयआयटी भुवनेश्वर आणि ओडिशातील इतर राष्ट्रीय संस्थांमधील विद्यार्थी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्राला भेट देण्यासाठी आले असून आज या विद्यार्थ्यांनी राजभवन मुंबई येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मुंबई भेटीचे आयोजन आणि सूत्रसंचालन आयआयएम मुंबईने केले होते.

आयआयटी भुवनेश्वर आणि ओडिशातील इतर राष्ट्रीय संस्थांमधील विद्यार्थी नेत्यांच्या गटाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याशी राजभवन, मुंबई येथे संवादात्मक बैठक घेतली. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिक्षण मंत्रालयाच्या ‘युवा संगम’ उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी महाराष्ट्राला भेट देत आहेत. या भेटीचे सूत्रसंचालन आयआयएम मुंबईने केले.



