तृतीयपंथी पांडुरंग गुरव ( देव मामा)यांच दातृत्व.

0
154

जोगवा मागत जमा केलेल्या पैशातून आदमापूर ता.भुदरगड या जिल्हा परिषदेच्या शाळेला एक लाख रुपये देणगी दिली.तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांनी यापूर्वी ही विविध मंदिरांना व सरकारी शाळांना स्वतः च्या वृद्धापकाळाचा विचार न करता लोखों रुपयांची देणगी दिली आहे.पांडुरंग गुरव यांचे गाव आसगोळी ता.चंदगड असूनही आदमापूर येथे देवदर्शनाला आले असता आदमापूर जिल्हा परिषदेच्या शाळेची अपूर्ण इमारत बघून शाळेला एक लाख रुपये देणगी दिली.सरकारी नोकरी, भरपूर पगार असूनही आपण ज्या शाळेत शिकत मोठं झालो त्या शाळेला कोणी फुटकी कवडी सुद्धा देत नाहीत.अपवाद काही कर्मचारी वा अधिकारी आहेत) भ्रष्टाचारी कर्मचारी व अधिकारी हे तर गेंड्याच्या कातडीचे असतात.देव मामा यांचे गाव वा शाळा आदमापूर नसतानाही एक लाख रुपये जोगवा मागत देतात म्हणूनच ही मदत उच्च कोटीची वाटत आहे.कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता,मदत केल्याचा व्हिडिओ शेअर न करता, प्रसिद्धी साठी पेपर बाजी न करता अतिसामान्य माणसं दुसऱ्यांच्या मदतीसाठी जेव्हा उभी राहतात तेंव्हा ती हिमालयाच्या उंचीची वाटतात.तृतीयपंथी पांडुरंग गुरव हे जोगवा मागत आपला उदरनिर्वाह करतात.लोक देव मामा म्हणून जोगवा व पैसे देतात.स्वत:ची उपजिविका साध्या पद्धतीने करत साठवलेले पैसे देव मामा शाळा वा मंदिराला दान करत असतात.देव मामा यांना वृद्धापकाळात जोगवा मागणे बंद झाल्यावर उदरनिर्वाह होणं अवघड आहे.आपल्या वृद्धापकाळासाठी पैसे साठवून औषध व भोजन यांची व्यवस्था करायचे सोडून साठवलेले पैसे दान करत फिरणारे देव‌ मामा कर्णाचा दुसरा अवतार आहेत.शाळेत शिक्षण घेऊन मुलेमुली मोठी व्हावीत,स्वत:च्या पायावर ऊभी राहावित म्हणूनच सरकारी शाळेला मदत करतात.देव मामा कोणत्याही ग्रंथालयात गेलेले नाहीत,कोणतेही पुस्तक वाचलेलं नाही, शिक्षण तर कोसो दूर असताना, कोणताही गुरु , शिक्षक वा मार्गदर्शक भेटला नसतानाही लाचार व अपमानास्पद जीवन जगत अनुभवांच्या पुस्तकातून देव मामा यांच्याकडे समाजभान वा दातृत्व आहे आहे..दातृत्व उच्च शिक्षणावर ,उच्च पदावर ,दर्जेदार स्कूलवर वा श्रीमंती वर अवलंबून नसते , तर त्यासाठी लागतो अंत:करणात मायेचा ओलावा, करुणा वा संवेदनशीलता.समाजात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे, असहाय दिव्यांग,जोगवा मागून जीवन जगणारे अथवा भविष्याची/वृद्धापकाळात ची कोणतीही तरतूद नसणारी वेडी माणसं आपली अर्धवट भरलेली ओंजळ भुकेल्या, रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी रिती करतात तेंव्हा आश्चर्यचकित व्हायला होतं.समाजात काही लोक वा संस्था क्राऊडफंडिग द्वारे देणगी जमा करून गरीब, गरजू, वंचित, भुकेलेल्या व वयोवृद्ध यांच्यासाठी माध्यम म्हणून सेवा करत असतात हे निश्चित कौतुकास्पद व गौरवास्पद केलेले सर्वच पैसे दान करण हेफारच मोठं सेवाभावी कार्य आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here