आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हूल्लडबाजी ; जिल्हा परिषद शाळेत केली मद्यपार्टी

0
119

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा आंबोली: आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केलेल्या बऱ्याच तक्रारी येत आहेत.आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्यपार्टी करुन हद्दपार केली आहे. आबोली गावठाणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हूल्लडबाज पर्यटक मद्यपान करून जेवत असतानाच हि घटना निर्दशनास आली. हा प्रकार पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी उघडकीस आणला देवस्थान परिसर शाळा इत्यादी परिसरात असे प्रकार घडता कामा नये यांची पुरेपूर दक्षता ग्रामस्थासह पोलिसांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. संबंधित हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नाहीतर जनतेला याकडे लक्ष द्यावे लागेल असा इशारा यावेळी गावडे यांनी पोलीसांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here