प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूरमध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त प्राचीन खोल खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा सोमवारी रात्री पारंपारिक वाद्याच्या गजरातरात पार पडला. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष केला.
खोल खंडोबा देवस्थान ट्रस्ट प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पाच दिवसापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले, उत्सवाची सांगता सोमवारी रात्री पालखी सोहळ्याने झाली रात्री पावणेआठच्या सुमारास छत्रपती मालोजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, यांच्या हस्ते आरती व पालखीला सुरुवात झाली मंदिराभोवती पाच फेऱ्या काढण्यात आल्या जय मल्हार ग्रुपने चाबूक वाद्य, धनगरी ढोलांचा गजर, वाघ्या मुरळ्यांचा जागर, केके बॉईज मित्र मंडळाने आकर्षक रोषणाई व भंडाऱ्याची उधळण केली, भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. मानाचा घोडा तसेच शिवाजी महाराजांच्या वेश भूषेमध्ये मावळे देखील उपस्थित होते हे सर्व पालखीचे आकर्षक ठरले, मंदिराच्या चौकामध्ये नेत्रदीपक रोशनाई करण्यात आली होती, मुख्य पुजारी खंडेराव जगताप , घनश्याम जगताप, मेघशाम जगताप, ओमकार जगताप, अमृतवेल मीडिया चे विशेष प्रतिनिधी अमोल निरगुंडे यस पी 9 चॅनलचे मॅनेजमेंट डायरेक्टर सागर पाटील,भास्कर कदम, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, दिगंबर भागींदरे, डॉक्टर महेश कदम, अनिल पाटील, रघुवीर देसाई, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.