प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा कागल : श्री. दादा महाराज झुरळे, डोंबिवली व कै. सुभेदार बाबुराव फराक्टे यांच्या स्मरणार्थ चिमगाव ता कागल येथे २१ वा श्री दत्त जयंती उत्सव संपन्न होत आहे, चिमगाव येथील नृसिंह सरस्वती सेवा मंडळ कायमच सामाजिक व धार्मिक वारसा जपण्याचे काम गेली २२ वर्षे सातत्याने करत आहे, यामध्ये आरोग्य शिबिर, रोग निदान व उपचार तसेच महिला सबलीकरणासाठी विविध प्रोत्साहनपर कार्यक्रम. तरुण पिढीला आध्यात्मिक व सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा देण्यासाठी उद्बोधन पर व्याख्याने, भजन, कीर्तन व प्रवचन असे विविध कार्यक्रम कायमच उत्साहाने साजरे केले जातात. यावर्षी शुक्रवार दि १३ डिसेंबर रोजी भव्य असे आरोग्य शिबिर यामध्ये स्त्रियांचे विकार लहान मुलांचे विकार, कॅन्सर, डोळ्यांची तपासणी, इसीजी, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर अशा विविध चाचण्या तसेच हृदयरोगासंबंधी एन्जिओग्राफी व एन्जोप्लास्टी या संदर्भातील उपचार केले जातील त्याचबरोबर रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म काळ व १६ डिसेंबर रोजी श्री स्वामी इंद्रिय शिवयोगी येऊन महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. अमरसिंह फराक्टे यांनी केले.