कोल्हापूर जिल्हा अवैध व्यवसाय व नशिले पदार्थ मुक्त करा शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी..

0
173

प्रतिनिधी श्रीकांत शिंगे

कोल्हापूर : आज सोमवार दिनांक 27 1 2025 रोजी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित साहेब यांची शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेऊन कोल्हापूर मध्ये चाललेल्या अनेक प्रकारच्या अवैध व्यवसाय संदर्भात व महत्त्वाचे कोल्हापूर नशिले पदार्थ मुक्त करा याविषयी चर्चा करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यामधील झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या ट्रेडिंग व्यवसाय मध्ये फसवणूक झालेल्या विषयी सुद्धा अनेक जणांनी विषय मांडला.

मटका गुटखा ऑनलाईन लॉटरी कॅसिनो कॅफे मीटिंग पॉइंट चंदगड तालुक्यातील शिनोळी गावामध्ये गोव्याच्या धरतीवर राजरोसपणे चाललेला कॅसिनो जुगार आड्या संदर्भात संबंधित डी वाय एस पी यांच्यामार्फत कारवाई करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली गुन्हे अन्वेषण शाखा व आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या जातात परंतु संबंधित अधिकारी व त्यांचे वर्षानुवर्षे असलेले कर्मचारी या तक्रारींकडे दुर्लक्षित करीत असतात भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्ये अवैध व्यवसाय, नशिले पदार्थ या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पुराव्यानशी थेट माझ्याशी संपर्क साधावा त्यांच्यावर कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन माननीय जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांनी दिले.

यावेळी संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, महेश उतुरे, मंजित माने, स्मिता सावंत, शशिकांत बिडकर, सुमित मेळवंकी, प्रसाद पोवार, युगंधर कांबळे, विशाल देशपांडे, अभिजित बुकशेट आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here