कोल्हापूर प्रतिनिधी
मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या रमजान रोजेंचा टाईम टेबल
अधिकृतपणे कोल्हापूर हिलाल कमिटी मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे .
शब-ए-बरातबद्दलची माहिती:
शब म्हणजे रात्र तर बारात हा अरबी शब्द आहे जो मोक्ष आणि क्षमा दर्शवितो.

शब-ए-बरात ही रात्र इस्लामिक कॅलेंडरनुसार शाबान महिन्याच्या १५ तारखेला साजरी केली जाते. जी आज तारीख 13 रोजी येत आहे
ही रात्र प्रार्थना आणि पश्चात्तापाची रात्र आहे.
या दिवशी जगभरातील मुसलमान अल्लाहकडे प्रार्थना करतात आणि स्वतःच्या अपराधाची क्षमा मागतात.
या रात्री, दिवंगत पूर्वजांच्या कबरांवर त्यांच्या प्रियजनांद्वारे मोक्ष प्राप्त व्हावा याकरिता प्रार्थना केली जाते मोठ्या संख्येने मुस्लिम समाज कब्रस्तान मध्ये जात आहे शब-ए-बरातला क्षमा रात्र, स्वातंत्र्य रात्र आणि प्रायश्चित्ताची रात्र असेही म्हणतात.शब-ए-बरातच्या रात्री, परमेश्वर सर्व पुरुष आणि महिलांच्या भूतकाळात तयार केलेल्या कार्यांचे लक्ष वेधून घेणारे वर्ष त्यांना भाग्य लिहितात.असे इस्लामचे स्कॉलर बोलतात .