सायबर ट्रस्ट संचलित महिला महाविद्यालयामध्ये पारितोषिकवितारण व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा.

0
83

प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी: सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्वेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन, कोल्हापूर येथे पारितोषिकवितारण व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दि १५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. मृणालिनी शिंगे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयातील वर्षभरातील सर्व उपक्रमांचा आढावा सादर केला. डॉ. अजितसिंह जाधव यांनी त्यांच्या भाषणात नवीन पिढीने कशाप्रकारे स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करून आपले ध्येय कसे गाठावे याबद्दल मार्गदर्शन केले. घराचा, समाजाचा तसेच देशाचा विकास होण्यात टीम वर्कचे महत्व त्यांनी विशद करून वडीलधाऱ्यांच्या आणि गुरुजनांचा मन राखणे तसेच चांगले मित्र जोडणे यामुळे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्या करण्यासाठी या गोष्टी अवलंबण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी सर्व विद्यार्थिनींना दिला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरातील सर्व उपक्रमामध्ये आणि क्रिडा स्पर्धामध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचा पारितोषिकवितारण सोहळा उत्साहात साजरा झाला.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स. प्रा.साक्षी देसाई यांनी केले. दुसऱ्या सत्रात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात बेचाळीस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे विद्यार्थिनींनी उत्साहात सादरीकरण केले. स. प्रा. श्वेता पाटील आयक्यूएसी समन्वयक, स प्रा रामेश्वरी गुंजीकर क्रिडा शिक्षक, स प्रा प्रिती गरगटे, कर्मचारी सचिव, डॉ . निलम जिरागे प्रमुख अन्न तंत्रज्ञान, स. प्रा.प्रज्ञा कापडी, प्रमुख फॅशन डिझाईन, स. प्रा. सीमा पाटील प्रमुख इंटेरियर डिझाईन, स. प्रा. प्रियांका चव्हाण समन्वयक पर्यावरण, सर्व शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा व उमेद निर्माण व्हावी हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. कार्यक्रम प्राचार्य प्रो डॉ. आर. जी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व स. प्रा.साक्षी देसाई समन्वयक कल्चरल समितीच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमास सायबर संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्थ डॉ. आर.ए. शिंदे व सचिव सीए एच .आर. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here