

प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल, कसबा बावडा, यांच्या वतीने येथे रंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. या स्पर्धेत 2 ते 7 वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला असून, रंगांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सृजनशीलतेला वाव दिला आहे.या स्पर्धेला कसाबा बावडया तील विविध शाळा मधून मुले आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून सुंदर कलाकृती साकारल्या.

सहभागी स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचा सुंदर आविष्कार सादर केला. परीक्षकांनी उपस्थित राहून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्याना व विजेत्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.मुख्याध्यापक सौ. सारिका माने मॅडम यांनी सांगितले की, “या स्पर्धेमुळे कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे सृजनशीलतेला चालना मिळते.”कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचा समारोप आनंददायी वातावरणात पार पडला.
