
प्रतिनिधी मेघा पाटील
अमरावती: पदवीनंतर विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञानशाखांमध्ये पारंगत व्हावे. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा व राष्ट्र निर्माणासाठी अविरत कार्यरत रहावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ४१ व्या दीक्षान्त समारंभात केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींच्या वसतीगृह आणि विस्तारीत इमारतीचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. राज्यपाल यांना राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. दीक्षान्त समारंभात शितल पांडव, निकिता देवचे, अनिकेत पांडे, राधा चमेडिया, हर्षाली हटवार, उत्कर्षा वानरे, धनश्री सरकळे, लक्ष्मी चौधरी, प्राची बोरगावकर, शेख इक्रा अदीबा मोहमंद मुश्ताक यांचा सत्कार करण्यात आला.


