
कोल्हापूर:”महिला उद्योजकांनी शिक्षणाबरोबर नव्या संधी शोधून यश मिळवावं आणि समाजात आदर्श घडवावा”* असे प्रतिपादन सौ. सुनंदा कुलकर्णी यांनी केले. त्या सायबर महाविद्यालयात आयोजित केलेल्या *महिला उद्योजकांचे शिक्षणाद्वारे सक्षमीकरण* या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या.सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्वेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन, कोल्हापूर येथे *“महिला उद्योजकांचे शिक्षणाद्वारे सक्षमीकरण”* या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेचे उद्घाटन श्रीनिधी या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सौ. सुनंदा कुलकर्णी, डॉ. व्ही. एम. हिलगे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुनंदा कुलकर्णी म्हणाल्या, महिला उद्योजकाना शिक्षणाने बळ मिळते, ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास यामुळे त्या पुढे जातात. महिलांनी व्यवसायातील नव्या संधी शोधून, मर्यादा झुगारून यश मिळून समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे असे त्या म्हणाल्या.प्रथम सत्रात श्रीमती गौरी मांजरेकर (संस्थापक, पंख फाउंडेशन, चिकोडी) या प्रमुख बीज भाषक होत्या. त्यांनी व्यवसायिक शिक्षण आणि महिला उद्योजकतेवरील अनुभव कथन केले.द्वितीय सत्राचे अध्यक्ष डॉ. वर्षा मेंदरगी होत्या. या सत्रामध्ये डॉ. शर्मिली माने यांनी सामाजिक उद्योजकता, अॅड. मानसी जोशी यांनी व्यवसायासाठी आवश्यक कायदेशीर बाबी आणि Ar. अमरजा निंबाळकर यांनी स्थापत्यशास्त्र क्षेत्रातील संधी व आव्हानांवर मार्गदर्शन केले.तृतीय सत्रात संशोधकांनी परिषदेच्या संकल्पनेशी निगडित १०३ शोध निबंधांचे ऑनलाईन व ऑफलाईन सादरीकरण केले. परिषदेत २७० हून अधिक व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.समारोप प्रसंगी डॉ. मेघा गुळवणी (अधिष्ठाता, आंतरशाखीय अभ्यास, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित होत्या. परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. सुनीता दळवाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. प्रज्ञा कापडी यांनी केले.परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सहा. प्रा. श्वेता पाटील, संयोजक सहा. प्रा. नीलम जिरगे यांनी नियोजन केले. सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.ए. शिंदे व सचिव सीए ऋषिकेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभल.