वाढलेल्या साखर दरातून उसाचा दुसरा हप्ता द्या साखर संचालकांना आंदोलन अंकुश संघटनेचे निवेदन.

0
53

शिरोळ प्रतिनिधी

चालू हंगामाच्या तोंडावर जिल्हाधिकारी व संघटनेच्या उपस्थिती बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना साखरेला दर वाढून मिळाला तर दुसरा हप्ता देण्याची तयारी साखर कारखान्यांनी दाखवली होती.हंगाम सुरु होताना बाजारात 3500 रुपये क्विंटलला असणारे दर आज 3800 रुपये झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना साखर निर्यातीचा कोटा मिळालेला आहे आणि निर्यात साखरेला सुद्धा चांगला दर मिळत असल्यामुळे यातुन शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आज निवेदणाद्वारे करण्यात आली.निवेदनात पुढे म्हंटले आहे की वाढलेल्या साखर दराचा फायदा शेतकऱ्यांना दिला पाहिजे कारण यावर्षी एकरी 10 टन उसाचे उत्पादन कमी मिळाले आहे. उत्पादन कमी, खर्च जादा आणि उसाची किंमत कमीत कमी मिळाल्यामुळे ऊस शेती तोट्यात गेली असून शेतकऱ्यांना अतिरिक्त दर मिळाल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही.आपण बैठकीत मान्य केलेनुसार वाढलेल्या साखर दरातील 300 रुपये दुसरा हप्ता म्हणून देण्याचे आदेश साखर कारखान्यांना द्यावेत अशी विनंती संघटने कडून करण्यात आली.यावेळी धनाजी चुडमुंगे दिपक पाटील नागेश काळे दत्तात्रय जगदाळे युनूस शेख, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here