
कागल उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर
बस्तवडे ता. कागल येथे श्री दत्तगुरु दूध संस्था बस्तवडे यांच्यावतीने स्वर्गीय लोकनेते मा. खासदार सदाशिवरावराव मंडलिक साहेब यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.**सुरुवातीस स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन श्री जगदंबा विकास सेवा संस्थाचे माजी चेअरमन श्री. प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष दूध संस्था चेअरमन श्री. एकनाथ चिखलकर हे होते .यावेळी स्वागत व प्रास्ताविक संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य सातापा कांबळे यांनी केले यावेळी त्यांनी मंडलिक साहेबांच्या कार्याचे थोडक्यात माहिती दिली व सर्वांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी दूध संस्था संचालक श्री. शिवाजी मा.पाटील ,सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले, अमृता माळी, भारत शिंदे, नेताजी वायदंडे व संचालक हजर होते शेवटी सर्वांचे आभार सचिव पांडुरंग वांगळे यांनी मांडले.