कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.
या घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषी अधिकारर्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शनिवारी विभागीय आयुक्त मधुकरराजें अर्दड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
ही मागणी मान्य न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गावकरी आणि समाजबांधव 31 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसले होते.
या आंदोलकावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अचानक लाठी हल्ला केला. या घटनेत अनेक महिला पुरुष ,वृद्ध आणि लहान मुले जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद छत्रपती संभाजी नगर शहरात उमटत आहेत येथील मराठा समाज या घटनेचे विरुद्ध एकवटला आणि त्यांनी ठीक ठिकाणी आंदोलन सुरू केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांना एक निवेदन दिले.
या निवेदनात मराठा समाजातील आंदोलकावर झालेल्या लाटी हल्ल्याचा निषेध केला या घटनेची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी ,निष्पाप आंदोलकावर लाट्या चालवण्याचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली ही मागणी मान्य न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना पश्चिम शहर प्रमुख विजय वाकचौरे , विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, विनायक पांडे, उपशहरप्रमुख संजय हरने, संदेश कवडे, चंद्रकांत इंगले, हिरा सलामपुरे, लक्ष्मीनारायण बाखरिया, गणेश सुरे, बाळासाहेब गडवे, हरीभाऊ हिवाले, संजय पवार, गणेश लोखंडे, मनोज मेठी, हनुमान शिंदे, अनिल लहाने, रतन साबले, प्रकाश कमलानी, नितिन पवार , अनिल जैस्वाल, रजयसिंग होलिये हरिभाऊ हिवाले, प्रीतेश जैस्वाल, मोहन मेघावाले, सिताराम सुरे, बन्सीमामा जाधव, सचिन खैरे, मकरंद कुलकर्णी, किशोर नागरे, रविकांत गवळी, संतोष खेंदकर, सुरेश गायके ,हेमंत दीक्षित, शेख रब्बानी, देविदास तुपे, पूनम गंगावाने, सुरेश व्यवहारे, गोवर पुरंदरे, सोमनाथ गुंजाल,सुधीर गाडगे ,प्रीतेश घुले, श्रावण उदागे लक्ष्मन जाधव, बंटी जैस्वाल, राहुल सोनवने, सचिन ढोकरट, रेवनाथ सोनवने , रोहित बनकर, संजय नवले निलेश घुले, संदीप हीरे, प्रतीक अंकुश, नारायण मते, सुरेश गायके,जगदीश लव्हाले, मंगेश कुलकर्णी, के .बी. चक्रनारयान, बापू कवले ,सुनील घोडके, संजू सराटे भागवत पाटिल आदी उपस्थित होते.