श्री विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी वाहतूक आदेश जारी

0
29

प्रतिनिधी :जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : प‌ट्टणकोडोली गावात 11 ते 15 ऑक्टोबरअखेर मोठया प्रमाणावर श्री विठ्ठल बिरदेव यात्रा साजरी करण्यात येणार आहे. पट्टणकोडोली गावात यात्रा कालावधीत येणा-या मोटर सायकल, चारचाकी मोटर वाहन, अवजड, जड व मध्यम माल वाहतूक वाहन, सरकारी प्रवाशी वाहतूक करणा-या एसटी बसेस व इतर मोटार वाहनांमुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असतात. ही यात्रा कोल्हापूर- हुपरी या मेन रोडवरच भरत असल्याने मंदीराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन त्या परिसरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या कालावधीत मोटार वाहतुकीचे व नागरिक / भाविकांच्या सोईसाठी मार्ग एकेरी वाहतुक / प्रवेश बंद व मोटार वाहनांना थांबण्यास, पार्किंग करण्यास मनाई केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील तसेच ग्रामपंचायत सेवेतील वाहने वगळून कोल्हापूर, उंचगाव, गडमुडशिंगी, सांगवडे, वसगडे, या परिसरातील प‌ट्‌ णकोडोली मार्गे गावातून मेन रोडने प‌ट्टणकोडोली परिसरात येणा-या मोटर सायकल, चारचाकी मोटर वाहन, अवजड, जड व मध्यम माल वाहतूक वाहन, सरकारी प्रवाशी वाहतूक करणा-या एसटी बसेस व इतर मोटार वाहनांना पट्टणकोडोली गावी जुने एसटी स्टॅण्ड प‌ट्टणकोडोली ते मेनरोड वरील यात्रा परिसर या ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.

इचलकरंजी, रांगोळी, रेंदाळ, यळगूड, हुपरी, तळंदगे, इंगळी, हातकणंगले या परीसरातील पट्टणकोडोली मार्गे गावातून मेन रोडने कोल्हापूरकडे जाणा-या मोटर सायकल, चारचाकी मोटर वाहन, अवजड, जड व मध्यम माल वाहतूक वाहन, सरकारी प्रवाशी वाहतूक करणा-या एसटी बसेस व इतर मोटार वाहनांना प‌ट्टणकोडोली गावी नवीन एसटी स्टॅण्ड, इंगळी फाटा, पट्टणकोडोली ते जुने एसटी स्टॅण्ड व मेनरोडवरील यात्रा परिसर या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

अवजड, जड व मध्यम माल वाहतूक करणा-या वाहनांना पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्था-
पट्टणकोडोली येथे येणाऱ्या सर्व मोटार वाहनांना जुने एसटी स्टॅण्ड, प‌ट्टणकोडोली-लालबहादूर शास्त्री चौक, पट्टणकोडोली-बाजारपेठ-हनुमान मंदिर, खटकोळे माळ भिमनगर नं 2 (इंगळी रोड-वृदावन गार्डन हॉटेल कॉर्नर) गणेशनगर ते लोकशाहीर साठे चौक (नवीन एसटी स्टॅण्ड) मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. या मार्गाकडुन येणा-या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था आंबेडकर भवन व गाव चावडी मार्गे कुस्ती मैदान, गणेश माळ या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

इचलकरंजी, रांगोळी, रेंदाळ, यळगूड, हुपरी, तळंदगे, इंगळी, हातकणंगले या परिसरातील प‌ट्टणकोडोली मार्गे गावातून मेन रोडने कोल्हापूर कडे जाणा-या मोटर सायकल, चारचाकी मोटर वाहन, अवजड, जड व मध्यम माल वाहतूक वाहन, सरकारी प्रवाशी वाहतूक करणा-या एसटी बसेस व इतर मोटार वाहनांना पट्टणकोडोली गावी नवीन एसटी स्टॅण्ड, इंगळी फाटा, प‌ट्टणकोडोली येथून मातंग वसाहत-पाटील गल्ली-कुंभार गल्ली- वड्ड गल्ली तळ्याजवळ ते जुने एसटी स्टॅण्ड प‌ट्टणकोडोली मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील. या मार्गाकडुन येणा-या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कै. बापुसो हुपरे कॉलेज, आनंत हायस्कुल पटांगन, साखर कारखाना कार्यालयाच्या जागेवर, पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली आहे.

रेमंड चौक, पंचताराकित एम.आय.डी.सी. कडुन पट्टणकोडोली मार्गे इचलकरंजीकडे जाण्यासाठी यळगुड, मांगुर फाटा, हुपरी रेंदाळ या मार्गाचा वापर करावा.

इचकरंजी कडुन पट्टणकोडोली मार्गे कोल्हापुरकडे जाण्यासाठी प्रवाशांनी रांगोळी, रेंदाळ, हुपरी – 5 स्टार MIDC-लक्ष्मी टेकडी, तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुर या मार्गाचा वापर करावा.

जुने एसटी स्टॅण्ड पट्टणकोडोली-लालबहादूर शास्त्री चौक पट्टणकोडोली-बाजारपेठ-हनुमान मंदिर, खटकोळे माळ भिमनगर नं 2 (इंगळी रोड-वृदावन गार्डन हॉटेल कॉर्नर)-गणेशनगर ते लोकशाहीर साठे चौक (नवीन एसटी स्टॅण्ड) या मार्गावरून येणा-या जाणा-या मोटर सायकलसह सर्व मोटार वाहनांना वरील यात्रा कालावधीत थांबण्यास व पार्कींग करण्यास तसेच मालाची, प्रवाशांची चढउतार करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच

नवीन एसटी स्टॅण्ड, इंगळी फाटा, पट्टणकोडोली येथून मातंग वसाहत-पाटील गल्ली-कुंभार गल्ली- वड्ड गल्ली तळ्याजवळ ते जुने एसटी स्टॅण्ड प‌ट्टणकोडोली या मार्गावरून येणा-या जाणा-या सर्व मोटार वाहनांना वरील यात्रा कालावधीत बांधण्यास व पार्कींग करण्यास तसेच मालाची, प्रवाशांची चढउतार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

वाहतूक नियोजनाबाबत नागरीक, रहिवाशी, भाविक, व्यापारी तसेच मोटार वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here