
प्रतिनिधी : जानवी घोगळे
पंकज धीर यांनी अनेक हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट तसेच हिंदी मालिकांमधून भूमिका गाजवलेल्या आहेत. महाभारत या मालिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. पंकज धीर गेल्या काही वर्षांपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढत होते. आज अखेर त्यांची कॅन्सरशी लढाई थांबली. निकीतीन धीर हा त्यांचा एकुलता एक मुलगाही अभिनेता आहे तर अभिनेत्री कृतिका सेनगर ही त्यांची सून. पंकज धीर यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.