
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज*च्या सहा खेळाडूंची निवड *जम्मू-कश्मीर येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आजरेकर फाउंडेशन तर्फे या सर्व प्रतिभावान खेळाडूंचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
या राज्यस्तरीय संघासाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये —
👉 कु. मुस्तफा फरास,
👉 कु. स्मित पार्टे,
👉 कु. प्रतीक गायकवाड,
👉 कु. विराज पाटील,
👉 कु. मयूर सुतार,
👉 कु. अविराज पाटील —
या सर्वांचा समावेश आहे. हे खेळाडू महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या संघाचे असून त्यांना क्रीडा शिक्षक प्रदीप साळुंखे यांचे सतत मार्गदर्शन लाभले.
सन्मान सोहळ्यावेळी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आश्किन आजरेकर यांच्या वतीने खेळाडूंना सन्मानचिन्ह व ट्रॅक सूट प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्योगपती तेज घाटगे, समर जाधव, स्वप्निल पार्टे, सुलतान फरास (काका), राजूभाई नदाफ, अशपाक आजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व कोल्हापुरातील फुटबॉल परंपरेचा वारसा राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन आजरेकर फाउंडेशनतर्फे करण्यात आले असून या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.