
प्रतिनिधी : जानवी घोगळे
दिनांक : २७ ऑक्टोबर २०२५ | वेळ : सायं. ५.३० ते ९.०० | ठिकाण : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर
कोल्हापूर –
कोल्हापुरातील संगीतप्रेमींसाठी एक सुरेल मेजवानी घेऊन येत आहे *‘चिंगारी कराओके स्टुडिओ’. या स्टुडिओच्या वतीने *हिंदी आणि मराठी चित्रपटसंगीतातील सदाबहार गीतांचा विशेष कार्यक्रम सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे ठिकाण म्हणजेच संगीत व सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर हे आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक धनंजय लोंढे यांनी सांगितले की, “संगीत ही भावना जोडणारी शक्ती आहे. या निमित्ताने कोल्हापूरातील रसिकांना जुन्या हिंदी व मराठी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील गाण्यांचा आनंद एकाच मंचावर अनुभवता येणार आहे.”
या कार्यक्रमात स्थानिक तसेच निमंत्रित गायक-गायिका आपल्या सुमधुर आवाजात एकापेक्षा एक अविस्मरणीय गीते सादर करणार आहेत. प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि मनाला भावणारा हा कार्यक्रम ठरणार असल्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
रसिक प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे चिंगारी कराओके स्टुडिओ तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
धूम धडाका दिवाळी नंतर दिनांक २७ ऑक्टोबर रोजी शाहू स्मारक येते संध्याकाळी सहा ते नऊ हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम तर्फे ठेवण्यात आलेला आहे प्रवेश विनामूल्य आहे तरी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.🌹🌹🌹

