कोल्हापूरच्या लोटस प्रोडक्शन आणि प्राजक्ता तावडे निर्मित “पायरव” या लघुपटाला इंडो दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट हा पुरस्कार प्राप्त झाला

0
42

प्रतिनिधी : जानवी घोगळे

प्रेस नोट

जगभरातून आलेल्या 200 चित्रपटांवर मात करून पायराव या लघुपटने आपले स्थान निर्माण केले. तसेच मुंबई येथे पार पडणाऱ्या कोहिनूर फिल्म फेस्टिवल मध्ये पाच कॅटेगिरी मध्ये नामांकन मिळवले आहे हा कोल्हापूरला मिळालेला एक बहुमानाचा आहे पायऱ्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून निर्मात्या आणि लेखिका प्राजक्ता तावडे यांनी चित्रपट क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे


उंच डोंगर वस्तीतील राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या सामाजिक समस्येवर हा लघुपट भाष्य करतो. एकूण 28 मिनिटांच्या या लघुपटात गावातील रस्त्याच्या कामासाठी मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी एका तरुणाची धडपड मांडण्यात आलेला आहे. लघुपताचे शूटिंग चित्रनगरी परिसरात या चार दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले असून. याचे लेखन आणि निर्मिती प्राजक्ता तावडे, दिग्दर्शन मकरंद लिंगनूरकर ,प्रकल्प प्रमुख मिलिंद अष्टेकर, चित्रीकरण आणि संकलन किरण जेजुरकर, तर मुख्य भूमिका अमोल नाईक राजश्री कोरे निहाल रुकडी कर रश्मिकांत चौगुले अमित कांबळे अक्षय वनकट्टी हे आहेत
शनिवारी सकाळी अकरा वाजता राम गणेश गडकरी सभागृह येथे या लघु चित्रपटाचा पोस्टर अनावरण आणि कलाकार तंत्रज्ञ गौरव सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर माननीय कृष्णराज महाडिक साहेब साहेब माननीय कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख सुजित चव्हाण साहेब माननीय सचिन जाधव साहेब युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय प्रसाद चव्हाण साहेब आणि संपूर्ण पायऱ्या टीम आणि कलाकार उपस्थित होते.

साता समुद्र पार मिळालेल्या या यशामुळे निर्मात्या प्राजक्ता तावडे आणि कोल्हापूरचे विशेष कौतुक होत आहे याचीच दखल घेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर साहेब माननीय कृष्णराज महाडिक साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय सुजित भाऊ यांच्या तर्फे लेखिका आणि निर्मात्या प्राजक्ता तावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला
हा लघुपट सर्व फेस्टिवल ला पाठवण्याची जबाबदारी राज मोहिते यांनी पार पडली आहे. इथून पुढे होणाऱ्या देशातील आणि देशाबाहेरील फेस्टिवल्स मध्ये हा लघुपट नक्कीच भरघोस यश संपादन करेल असा विश्वास निर्मात्या प्राजक्ता तावडे यांनी बोलून दाखवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here