
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
विद्यार्थ्यांच्या यशाने पाचगावचा अभिमान उंचावला
ग्रामपंचायतीतर्फे गुणवंत खेळाडूंचा गौरव
पाचगाव प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थी तसेच पालकांनी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल गौरवाची शाबासकी दिली, तर त्यांना अधिक प्रोत्साहन मिळते आणि ते अभ्यासात तसेच विविध क्षेत्रांत उज्वल कामगिरी करतात, असे प्रतिपादन उपसरपंच सौ. दिपाली प्रकाश गाडगीळ यांनी केले.
पाचगाव येथील विविध शैक्षणिक, सामाजिक व क्रीडाक्षेत्रात प्राविण्य मिळवून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गावाचे नाव उज्वल करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा पाचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या खेळाडूंनी मिळवलेले यश संपूर्ण पाचगावकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या गौरव सोहळ्यात
दयानंद निवृत्ती जाधव,
समेध संग्राम मगर,
वेदांत सचिन पाटील,
वैभव राजू भालकर,
प्रणव गणेश यादव,
पृथ्वीराज प्रवीण यादव
या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

हा सत्कार पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियंका संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, शांताराम पाटील, सचिन पाटील, अभिजित पौंडकर तसेच माजी सरपंच संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने त्यांना भविष्यात अधिक यश मिळविण्याची प्रेरणा मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे पाचगावमध्ये शिक्षण व क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

