प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
नवी दिल्ली : नेहमी देशात भारत, हिंदुस्थान किंवा इंडिया याबाबत वाद होत राहतात.
अनेक लोक देशाच्या नावाबद्दल भिन्न मते देखील व्यक्त करतात.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की भारतला इंडिया का म्हटले गेले आणि त्याचे नाव कसे पडले. त्याची कहाणी अत्यंत रंजक आहे. काही लोक असे मानतात की इंडिया हा शब्दसुद्धा सिंधू संस्कृतीतून आला आहे. इंडिया या शब्दावरुन बरेच वाद झाले.
भारत नाव कसे पडले?
काही लोक म्हणतात की, भारत किंवा भारतवर्ष हे देशाचे खरे नाव आहे. असे म्हणतात की या देशाचे नाव भरत घराण्याच्या नावावरुन पडले. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता असे म्हणतात.
राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो. म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या शक्तिशाली राजाच्या नावावरुन भारत देशाचे नाव देण्यात आले.
काय आहे 17 व्या शतकाचा इतिहास?
काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की भारतासाठी इंडिया हा शब्द ग्रीक वरून लॅटिन भाषेत बदललेल्या इंडिका या शब्दापासून प्रेरित झाला आहे. ब्रिटिशांनी सर्वात प्रथम भारताऐवजी इंडी (Indie) शब्द वापरला.
सुरुवातीच्या काळात फ्रेंच भाषेच्या प्रभावामुळे त्यांनी हे केले होते. पण 17 व्या शतकात ब्रिटीश सरकारने इंडियाला स्वीकारले आणि नंतर हे नाव जबरदस्तीने लागू केले.
ब्रिटीश हळूहळू भारत काबीज करीत होते आणि नावे बदलत होते. येथील वसाहतीच्या काळात त्यांनी इंडिया हा शब्द प्रचंड वापरला. यामुळे, काही लोक अजूनही मानतात की इंडिया हा शब्द गुलामीचे प्रतीक आहे.
संसदेच अधिवेशन ९ संप्टेबर २०२३ पासून सुरु होत असून या दिवसापासून यामध्यें बदल करुन ‘ india ‘ एवजी भारत अस नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.