
प्रतिनिधी : जानवी घोगळे
जरग नगरच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक वाटचालीत जरग परिवाराचे योगदान कधीही वेगळे करता येणार नाही, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. केवळ जरग नगरच नव्हे, तर संपूर्ण परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून जरग परिवाराने समाजाला आपले कुटुंब मानत निःस्वार्थ भावनेने सेवा केली आहे. पद असो वा नसो, समाजाप्रती असलेली जबाबदारी मनापासून पार पाडण्याची परंपरा या परिवाराने जपली असून, भविष्यातही हीच सेवा अखंड सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर जरग परिवारातील प्रतिनिधी **सौ. सुषमा संतोष जरग** या येत्या महापालिका निवडणुकीत **काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी** करत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे जरग नगर व परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्याचा वारसा, स्थानिक प्रश्नांची जाण आणि विकासाची स्पष्ट भूमिका यामुळे नागरिकांकडून त्यांना मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.सौ. सुषमा जरग यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या भागाचा नव्या ऊर्जेने कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना संधी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, जरग परिवाराला आतापर्यंत मिळत आलेले नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद व सहकार्य याच ताकदीवर हे नवे आव्हान पेलले जाईल, असे मत व्यक्त करण्यात आले. “नागरिकांचे शुभाशिर्वाद व प्रोत्साहन हेच आमचे खरे बळ असून, त्यांच्या सहकार्याने परिसराचा सर्वांगीण विकास साधू,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.जरग नगरच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला जरग परिवार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा यांचा संगम या निवडणुकीत दिसून येत असून, आगामी काळात या निवडणुकीकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. सौ. वैभवी संजय जरग

