
प्रतिनिधी : जानवी घोगळे
प्रभाग क्रमांक 17 मधील विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसरात प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, अर्चना बिरांजे, शुभांगी पाटील या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारफेरीत सहभाग होऊन सर्वांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांचा विशेषतः महिलांची अभूतपूर्व उपस्थिती आणि भक्कम पाठिंबा लाभला. महिलांनी काँग्रेसच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत विकासासाठी पाठींबा दिला आहे. या जनसमर्थनामुळे येत्या 15 तारखेला काँग्रेसच भारी ठरणार असा आत्मविश्वास वाटतो.

या प्रचार फेरीला काँग्रेसचे सर्व उमेदवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, बबनराव रानगे, कमलाकर भोपळे यांच्यासह विक्रमनगर टेंबलाईवाडी परिसरातील शेकडो नागरीक प्रचारफेरीत सहभागी झाले.

सोमवार, 12 जानेवारी 2025 स्थळ- टेंबलाईवाडी, कोल्हापूर


