
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर येथील कुक्कुट प्रक्षेत्रावर प्रशिक्षणार्थींसाठी वर्षभर कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्कीट हाऊस जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी-5 दिवस, प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 200, प्रशिक्षणाचा कालावधी-15 दिवस, प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 500, प्रशिक्षणाचा कालावधी- 30 दिवस – प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 2 हजार, प्रशिक्षणाचा कालावधी- 6 महिने, प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 4 हजार रुपये असून प्रशिक्षण ऑनलाईन / ऑफलाईन असणार आहे.
प्रशिक्षणासाठी आधार कार्ड, शिक्षण दाखला (10 वी 12 वी मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला), दोन फोटो व जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत. प्रशिक्षणामध्ये देशी, मांसल पक्षी व अंड्यावरील पक्ष्यांच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात येते. अधिक माहितीसाठी -0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

