कोतोली जि.प. मतदारसंघात शिंदे सेनेच्या उमेदवारांचा घराघरांत प्रचार; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
93

कोतोली प्रतिनिधी – पांडुरंग फिरिंगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात आज शिंदे सेनेच्या जिल्हा परिषद उमेदवार वर्षाराणी अरुण पाटील व पंचायत समिती उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी मतदारसंघात सघन प्रचार दौरा केला. घराघरांत जाऊन मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांनी मतदारांचा आशीर्वाद मागत विजयी करण्याचे आवाहन केले.कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण रिंगणात उतरल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी मतदारांना दिला.


आजच्या प्रचारादरम्यान महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. सोनाली आण्णासाहेब गायकवाड व वर्षाराणी पाटील यांच्या पुढाकाराने तेलवे, नणुद्रे, घोटवडे, उंड्री व निवडे या गावांमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तसेच गावागावात औक्षण करून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. घराघरांत संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा व भविष्यातील आराखडा मतदारांसमोर मांडण्यात आला. या प्रचारामुळे शिंदे सेनेच्या उमेदवारांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here