पन्हाळा पश्चिमेत जनसुराज्य प्रचाराला उधाण; ज्योतिरादित्य कोरे यांचा तरुणांशी थेट संवाद, स्वागताचा वर्षाव

0
91

कोतोली प्रतिनिधी – पांडुरंग फिरिंगे
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार संगीता शंकर पाटील व पंचायत समिती उमेदवार सुनील महिपती चौगुले यांच्या प्रचारासाठी युवा नेते ज्योतिरादित्य कोरे यांनी पन्हाळा पश्चिम भागात दौरा करून मतदारांशी, विशेषतः तरुणांशी थेट संवाद साधला.
या वेळी अनेक ठिकाणी नागरिक, युवक व कार्यकर्त्यांनी उमेदवार व कोरे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. फुलांच्या हारांनी, घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजरात वातावरण भारावून गेले होते.
कोरे यांनी आपल्या भाषणात तरुणांना प्रेरणा देत “जनसुराज्यच्या माध्यमातून या भागातील विकासकामांना गती दिली जाईल. तरुणांनी पुढे येऊन परिवर्तनासाठी काम करावे व आपल्या उमेदवारांना विजयी करावे,” असे आवाहन केले. त्यांच्या जोशपूर्ण व स्फूर्तीदायी भाषणाला उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली.


यावेळी चेअरमन सागर वर्पे, बबन पोवार, कृष्णा कराळे, रामभाऊ सावंत, संभाजी सुतार, महादेव खांडेकर, उपसरपंच पी. आर. पाटील, प्रा. बी. के. जाधव, तसेच उमेदवार संगीता पाटील, अंजली चौगुले, सुनील चौगुले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दौऱ्यामुळे पन्हाळा पश्चिम भागात जनसुराज्य पक्षाच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here