
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. २३ (जिमाका) : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते व सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, कोल्हापूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवानांचे कुटुंब यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ८.२० ते १०.०० वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

