
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): भारतीय प्रजासत्ताक 76 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदन प्रसंगी सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व उपस्थितांना यावेळी शुभेच्छा दिल्या.





