
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर पाडली खुर्द मतदारसंघ क्रमांक ४२ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला जोर चढताना दिसत आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ. पल्लवी सचिन पाटील यांनी महिलांसह घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला.
या घरोघरी प्रचारादरम्यान मतदारांना शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती देण्यात आली तसेच उमेदवार सचिन पाटील यांच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. प्रचाराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
या वेळी अनिता गुरव, धनश्री पाटील, सचिन भट, प्रवीण पाटील, हेमंत देसाई आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडली.
पाडली खुर्द मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार अधिक व्यापक होत असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

