कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
संभाजीनगरमध्ये आजपासून दोन दिवस कॅबिनेटची बैठक होत आहे. तब्बल सात वर्षानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ संभाजीनगरात आलं आहे.
राज्याचे 400 अधिकारीही संभाजीनगरात दाखल झाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची आजपासून औरंगाबादेत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादेत लोटलं आहे.
तब्बल सात वर्षानंतर ही बैठक होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबादमध्ये आजपासून दोन दिवस राज्यमंत्रिंमडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला 29 मंत्री उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे बैठकीसाठी येणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे.
औरंगाबादच्या स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक होत आहे. 17 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या मराठवाडामुक्ती संग्रामाचे 75 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे मराठवाड्यात ही बैठक होत आहे.
अनुशेष भरून काढणार का?
मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. मराठवाड्याचा राहिलेला अनुशेष हा भरून काढण्यात येणार का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचा ठरणार आहे.
या बैठकीत एकूण 75 निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीसाठी 400 अधिकारी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयपीएस दर्जाचे 6 वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त दर्जाचे 23 पोलीस अधिकारी, 115 पोलीस निरीक्षक, 296 पीएसआय, 1700 पोलीस, 147 महिला पोलीस, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, होमगार्ड 500 असे एकूण 3 हजार पोलीस संपूर्ण शहरात तैनात असणार आहेत.
येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. संशयितांवरही करडी नजर असणार आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकूण 15 मोर्चे धडकणार आहे. यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचितचा मोर्चा लक्षवेधी ठरणार आहे.
मोर्चे किती
एकुण मोर्चे – 15 एकुण धरणे/ निदर्शने -06 एकुण निवेदन – 04 मोर्चा रूट – क्रांती चौक ते भडकल गेट धरणे ठिकाण – भडकल गेट