“सखी one stop centre” मार्फत मुलींना माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीम. नीलम धनवडे आणि श्रीम. ऍड. अनुराधा मनागावकर यांना आमंत्रित. करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये कौटुंबिक हिंसाचार पीडित, लैंगिक शोषणाच्या बळी पडलेल्या मुली व महिलांसाठी वैद्यकीय, मानसिक, कायदेशीर पोलिसांची मदत कशी मिळू शकते याबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. दिव्या सातपुते (फुड टेक्नॉलॉजी विभाग) यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, आय. क्यू. एस.सी. कॉर्डिनेटर व फूड टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख सौ. श्वेता पाटील, इक्वल अपॉर्च्युनिटी सेल चे सर्व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. आर. ए शिंदे. यांचे मोलाचे सहकार्य लाभले.