कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात तब्बल वीस वर्षानंतर सजली भीमराव पांचाळे यांची गझल.

0
116

फाउंडेशनच्या या अनोख्या आयोजनाचे रसिकांकडून कौतुक अश्रूंच्या नकळत जखमांशी सलगी करण्याचा अघोरी प्रकार म्हणजे गझल.

असं सांगत गझलकार भीमराव पांचाळे यांनी कोल्हापूरचा रसिक केला मंत्रमुग्ध.. “आरशाला भावलेली माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?

या ओळी अशा गझल रसिकांच्या ओठावर असतातच पण या ओळींना जेव्हा गजलनवाज भीमराव पांचाळे स्वरसाज चढवतात तेव्हा स्वरांचा स्वर्ग उभा राहतो.

कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल मैफलीचा अनुभव सोहळा मंगळवारी पार पडला. डॉ. प्रवीण कोडोलीकर आणि योगिता कोडोलीकर यांच्या प्रयोदी फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या

या गझल कार्यक्रमाचे उद्घाटन भगीरथी महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पार पडले.

या उद्घाटनप्रसंगी विभागीय शिक्षण सहसंचालक अशोक उबाळे , रिपाइं जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, पत्रकार गुरुबाळ माळी, विजय महाडिक, वृषाली पाटील, डॉ.सरोज बिडकर, डॉ. सत्यजित कोसंबी, किशोर घाटगे, अशोक पाटील, रणजीत झपाटे, अजिंक्य शिंदे, महेश राठोड, समाधान बनसोडे उपस्थित होते.

या सर्वांचं स्वागत डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी राष्ट्रसेवा दल हे पुस्तक देऊन केलं. तर गझलकार भीमराव पांचाळे यांचा सन्मान कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिमा देऊन मान्यवरांच्या मंगल हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रयोदी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.योगिता कोडोलीकर यांचा वाढदिवस आणि फाउंडेशनचा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरातील गझल रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महत्त्वाचे म्हणजे गझल नवाज भीमराव पांचाळे यांची कन्या भाग्यश्री पांचाळे प्रथमच कोल्हापूरमध्ये आपले गायकीचे भाग्य आजमावत होती. “आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे, “तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे.

या गजलेला अक्षरशः रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. हे का कुणी फुलांना सांगायला हवे ऋतूशी त्यांनी कसे वागायला हवे.

या गजलेतून निसर्गाचा गजलेशी असणारा ऋणानुबंध उलगडत गेला. या मैफलीचे उत्तम निवेदन केलं ते कवी किशोर बळी यांनी गजलेची उत्तम जाण आणि अंगी असणारा हजरजबाबीपणा यामुळे त्यांचे निवेदन रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here