प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आजच्या चौथ्या दिवशी जरांगेंना अनेक गावातून पाठिंबा मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सात गावांनी आतापर्यंत राजकीय नेत्यांना ‘नो एन्ट्री’ केली आहे. त्यात आता करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द आणि शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकली या गावाचा समावेश आहे.
पाडळी खुर्द गावात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचा फलक लावण्यात आला आहे. त्या नंतर आज पाडळी खुर्द ता करवीर येतील माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ निलम अमित कांबळे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर समाजाच्या पाठिंब्या सह राजकीय लोकप्रतिनिधींच्या गावबंदीला प्रतिसाद वाढू लागला आहे